Translate

सोमवार, २७ मार्च, २०२३

सायटिका व मणक्याच्या विकारांसाठी नैसर्गिक उपचार -

१. सकाळी ब्रश झाल्यावर एक ग्लास कोमट पाण्यातून चहाच्या चमच्याने पाव चमचा हळद घ्यावी. नंतर अर्धा तास काही सेवन करु नये.

२. या काळात किमान दोन किलोमीटर नेहमीच्या गतीने चालण्याचा व्यायाम करावा.

३. सकाळचे जेवण ११ पूर्वी व रात्रीचे ८ पूर्वी घ्यावे. जेवणापूर्वी एक तास आणि नंतर एक तास पाणी पिऊ नये. जेवताना घोट, घोट पाणी प्याले तरी चालेल.

४. रात्री ११ पूर्वी झोपावे आणि सकाळी ७ पूर्वी उठावे.

५. आठवड्यातून एकदा रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात चार चमचे तूप घालून प्यावे. 

६. दररोज रात्री झोपताना आणि सकाळी आंघोळीच्या आधी एक तास कंबर आणि दोन्ही पायांना खाली सांगितलेले  तेल लावून हलक्या हाताने चोळून जिरवावे. आंघोळ नेहमी कोमट पाण्यानेच करावी.

७. हे खाऊ नये - गहू, दही, मैदा, आंबवलेले पदार्थ, दूध नासवून बनवलेले पदार्थ, वांगी, बटाटा, रिफाईंड तेल, पालेभाजी, मोड आलेली कडधान्ये, शिळे अन्न, थंड पेय व थंड पदार्थ, फास्ट आणि जंक फूड, हॉटेलचे पदार्थ, मांसाहार

८. हे खावे - ज्वारी, बाजरी, नाचणी, जुना तांदूळ, लोणी काढलेले ताजे ताक चिमूटभर सुंठपूड घालून, फळभाज्या, भारतीय फळ, ताजे व घरचे अन्न, लाकडी घाण्याचे किंवा फिल्टर्ड शेंगदाणा तेल, भाजलेल्या कडधान्यांच्या उसळी, कोमट अन्न आणि पाणी, तूप, सकाळी आणि रात्रीच्या जेवणात चार चार चमचे कच्चे तेल, लसूण, आलं, मुळा, दूध

९. Cap. Flax Seed oil
    Cap. Glucosamine
    Cap. Moringa
   Cap. Arthrohills
   Arthrohills Ultra oil
या कशा घ्यायच्या ते पाठवताना सोबत लिहून पाठवतो.

१०. हे टाळावे -  कमरेतून वाकणे, वेगवान वाहनातून प्रवास, दुचाकी, रिक्षा, बस याद्वारे प्रवास, एकाच टप्प्यात ५० किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास, एकाच जागी बसून राहणे किंवा अधिक काळ उभे राहणे, वजनदार वस्तू उचलणे किंवा ढकलणे, ओढणे, धावपळ, कंबर व पायावर ताण येईल अशी कामे किंवा अतिकाम

डॉ. आनंद वामन कुलकर्णी
                        D.Y.N.D.
निसर्गोपचार, योग, आहार तज्ज्ञ
जयसिंगपूर - ४१६१०१
मोबाईल - 7744964550

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शिलाजीत - औषधही ... नैसर्गिक टॉनिकही

शिलाजित, ज्याला मुमिजो किंवा मिनरल पिच असेही म्हणतात, हा हिमालय, तिबेट आणि अल्ताई पर्वताच्या उंच प्रदेशात आढळणारा एक नैसर्गिक पदार्थ आहे.  ह...