Translate

बुधवार, ५ एप्रिल, २०२३

मधुमेह - रक्त शर्करेबरोबरच रुग्णालाही नॉर्मल करणारा उपचार

मधुमेहात रक्त शर्करा औषधानी नॉर्मल होईल. पण, रुग्ण नॉर्मल होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दिनचर्येवर लक्ष देणे आवश्यक आहे. या दृष्टीने खालील उपचार सुचवित आहे.

१. सकाळी ब्रश झाल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात दोन चिमूट हळद टाकून प्यावे.

२. नंतर सूर्योदयाच्या सुमारास नेहमीच्या गतीने किमान तीन किलोमीटर चालण्याचा व्यायाम करावा.

३. नंतर खुर्चीत मागे टेकून बसावे. दीर्घ श्वास घ्यावा आणि कमरेत वाकून दोन्ही गुडघ्यांच्या बाहेरील बाजूने हात घेवून पायाचे अंगठे धरावेत. या स्थितीत जितके शक्य आहे तेवढा वेळ थांबावे. नंतर पुन्हा मूळ स्थितीत यावे. सहा पासून सुरुवात करुन रोज एकने वाढवत ही कृती २१ वेळा करावी.

४. सकाळचे जेवण १० ते ११ च्या दरम्यान आणि रात्रीचे सूर्यास्तापूर्वी घ्यावे. सकाळच्या निम्मा आहार रात्री घ्यावा. जेवणापूर्वी एक तास आणि जेवणानंतर एक तास पाणी पिऊ नये.

५. हे खाऊ नये - गहू, दही, साखर, बेकरीचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ, थंड पेय, थंड पदार्थ, आईस्क्रिम, दुग्धजन्य पदार्थ, पनीर, फास्ट फूड, जंक फूड, हॉटेलचे पदार्थ, पाश्चराईज्ड पॉलीबॅगमधील दूध, रिफाईंड तेल, मिठाई, विदेशी पदार्थ आणि फळ

६. हे खावे - ज्वारी, बाजरी, नाचणी, लोणी काढलेले ताजे ताक, फिल्टर्ड शेंगतेल, कसलीही प्रक्रिया न केलेले दूध (गवळ्याकडील दूध घरी तापवावे), पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य, देशी फळं, भेंडी, मेथी, मुळा, हळद

७. Cap. Karela Jamun
    Tab. Diabohills
     Shuddha Shilajeet
    Cap. Amalaki / Tab.         Amala
या कशा घ्यायच्या ते पाठवताना लिहून देतो.

८. रात्री झोपण्यापूर्वी दहा मिनिटे अनुलोम विलोम प्राणायाम, ध्यान करावे.

९. रात्री १० नंतर जागू नये आणि सकाळी ६ नंतर झोपू नये. दुपारी अजिबात झोपू नये.

१०. सूर्यास्तानंतर काही खाऊ नये. आवश्यक नसेल तर पाणीही पिऊ नये.

या दशसूत्रीचा वापर केल्यास रक्तातील साखर नॉर्मल राहिलच पण, रुग्णही नॉर्मल होईल.

महत्त्वाचे - हे उपचार करताना डॉक्टरांनी दिलेली औषधे सुरु ठेवावीत. पंधरा दिवसांनी रक्तशर्करा तपासून तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांच्या औषधांबाबत निर्णय घ्यावा. डॉक्टरांची औषधे परस्पर बंद करणे, त्याचा डोस बदलणे धोकादायक ठरु शकते.

वर दिलेली औषधे खालील लिंकवर क्लिक करुन तुम्ही आपल्या ऑनलाईन स्टोअरवरून घर पोहोच मागवू शकता.
https://anandkulkarni.In

डॉ. आनंद वामन कुलकर्णी
                        D.Y.N.D.
निसर्गोपचार, योग, आहार तज्ज्ञ
जयसिंगपूर - ४१६१०१
मोबाईल - 7744964550

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शिलाजीत - औषधही ... नैसर्गिक टॉनिकही

शिलाजित, ज्याला मुमिजो किंवा मिनरल पिच असेही म्हणतात, हा हिमालय, तिबेट आणि अल्ताई पर्वताच्या उंच प्रदेशात आढळणारा एक नैसर्गिक पदार्थ आहे.  ह...