Translate

सोमवार, २७ मार्च, २०२३

केस गळती, केसांच्या विविध समस्यांवर निसर्गोपचार -

१.जाहिरातीतील दावे खरे मानून कुठलाही शाम्पू अथवा तेल केसांना लावू नये. या समस्येसाठी वरच्या उपायांइतकाच पोटाचे आरोग्य सुधारणारा उपचारही तितकाच महत्वाचा आहे.

२. आंघोळीच्या  वेळेस केसांना शिकेकाई पूड लावावी. आंघोळीच्या नंतर साधे फिल्टर्ड खोबरेल तेल (पॅराशूट वगैरे नव्हे) केसांना लावावे आणि चांगले चोळून जिरवावे.

३. सकाळी ब्रश झाल्यावर १ चमचा आवळा चूर्ण एक ग्लास  कोमट पाण्यासोबत घ्यावे.

३. हे खाऊ नये - खारवलेले पदार्थ, चटपटीत व मसालेदार पदार्थ, फास्ट फूड, बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, दही, आंबट आणि आंबवलेले पदार्थ

४. सकाळचे जेवण ११ पूर्वी आणि रात्रीचे सूर्यास्तापूर्वी करावे.

५. Cap. Wheat Grass
     Cap. Aloe Vera
     Tab. Triphala
      Tab. Shatawari
या कशा घ्यायच्या ते पाठवताना लिहून देतो.

६. जाग्रण टाळावे, सकाळी उशीरा पर्यंत झोपणे, दुपारी झोपणे टाळावे.

७. केसांना कलप लावू नये. अगदीच गरज असेल तर महूरी हिना मेहेंदी लावावी.

८. केसात कोंडा किंवा खपल्या होत असतील तर आठवड्यातून तीनदा सकाळी डोक्याला लिंबाचा रस लावावा. नंतर पंधरा मिनिटांनी आंघोळ करावी.

याप्रमाणे किमान तीन महिने उपाय करावा. त्यानंतरही समस्या कायम राहिली तर प्रत्यक्ष भेटावे.
डॉ. आनंद वामन कुलकर्णी
                        D.Y.N.D.
निसर्गोपचार, योग, आहार तज्ज्ञ
जयसिंगपूर - ४१६१०१
मोबाईल - 7744964550

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शिलाजीत - औषधही ... नैसर्गिक टॉनिकही

शिलाजित, ज्याला मुमिजो किंवा मिनरल पिच असेही म्हणतात, हा हिमालय, तिबेट आणि अल्ताई पर्वताच्या उंच प्रदेशात आढळणारा एक नैसर्गिक पदार्थ आहे.  ह...