Translate

मंगळवार, २८ मार्च, २०२३

सोरायसिस आणि विविध त्वचा रोगांसाठी नैसर्गिक उपाय -

१. कोणतेही साबण, शाम्पू वापरु नये. हरभऱ्याच्या डाळीचे पीठ दुधात कालवून ते अंगाला लावावे आणि स्नान करावे. देशी गाईचे दूध मिळाले तर उत्तमच. नसेल तर म्हशीचे वापरावे पण जर्सी चे अजिबात नको.

२.आंबेहळद दुधाच्या साईत कालवून रात्री झोपताना लावावी.

३. Cap. Neem
    Cap. Aloe Vera
    Cap. Aamalaki
    Cap. Haridra
या कशा घ्यायच्या ते पाठवताना लिहून देतो.

४. आठवड्यातून एकदा रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे एरंडेल तेल टाकून प्यावे. त्यानंतर तीन दिवसांनी एक दिवसाचा पूर्ण उपवास करावा. उपवासाच्या दिवशी फक्त पाणी आणि जिऱ्याची फोडणी दिलेले ताजे ताक दर दोन तासांनी एक एक ग्लास प्यावे.

५. गहू, तूर डाळ, मैद्याचे पदार्थ, आंबट व आंबवलेले पदार्थ, शिळे, फ्रिजमधील पदार्थ, मसालेदार आणि तेलकट पदार्थ, बेकरीचे पदार्थ, मांसाहार, दूध दही आणि फळांचे एकत्र सेवन, आंबाडी अजिबात खाऊ नये.

६. फळ, फळभाज्या यांचा आहारात भरपूर समावेश असावा.

७. आंघोळीच्या एक बादली पाण्यात एक ग्लास याप्रमाणे ताजे गोमूत्र मिसळावे. उपलब्ध नसेल तर गोमूत्र अर्क वापरला तरी चालेल.

८. रोज सकाळी सूर्योदयाच्या सुमारास साधारण ४ कि.मी. चालावे किंवा २४ सूर्यनमस्कार घालावेत.

९. कडक ऊनापासून त्वचेचे रक्षण करावे. जाग्रण करु नये. पचन बिघडेल असे काही करु नये.

१०. सकाळचे जेवण दहापूर्वी आणि रात्रीचे सात ते आठच्या दरम्यान घ्यावे.

डॉ. आनंद वामन कुलकर्णी
                        D.Y.N.D.
निसर्गोपचार, योग, आहार तज्ज्ञ
जयसिंगपूर - ४१६१०१
मोबाईल - 7744964550

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शिलाजीत - औषधही ... नैसर्गिक टॉनिकही

शिलाजित, ज्याला मुमिजो किंवा मिनरल पिच असेही म्हणतात, हा हिमालय, तिबेट आणि अल्ताई पर्वताच्या उंच प्रदेशात आढळणारा एक नैसर्गिक पदार्थ आहे.  ह...