Translate

मंगळवार, २८ मार्च, २०२३

गुडघे दुखी, सांधे दुखी, संधीवातासाठी नैसर्गिक उपचार

१. आठवड्यातून तीन वेळा सकाळी संपूर्ण शरीराला तिळाच्या तेलाने हलके मालिश करावे. नंतर कोमट पाण्याने स्नान करावे.

२. रोज रात्री झोपताना दुखणाऱ्या सांध्याना खाली सुचवलेले तेल लावून हलक्या हाताने चोळून जिरवावे. यानंतर वाऱ्यात अजिबात जावू नये.

३. सकाळचे जेवण ११ पूर्वी आणि रात्रीचे सूर्यास्तापूर्वी करावे. दुपारी भूक लागली तर हलका नाष्टा किंवा फलाहार घ्यावा. सकाळच्या निम्मा आहार रात्री घ्यावा.

४. जेवणानंतर लगेच झोपू नये. दुपारी झोपू नये. रात्री ११ पूर्वी झोपावे आणि पहाटे ५ वाजता उठावे.

५. आठवड्यातून तीन वेळा रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे तूप घालून प्यावे.

*६. हे खाऊ नये - गहू, वांगी, मैदा आणि मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड, पाश्चात्य फळे आणि खाद्यपदार्थ, दही, दूध नासवून बनवलेले पदार्थ, रिफाईंड तेल, पाश्चराईज्ड पॉलीबॅगमधील दूध, हवाबंद डब्यातील पदार्थ, थंड पेय व पदार्थ, आईस्क्रिम, मसालेदार, चमचमीत पदार्थ, प्रेशर कुकरचा भात, अॅल्युमिनियमच्या भांड्यात ठेवलेले किंवा शिजवलेले अन्न पदार्थ, फ्रिजमधील अन्न आणि पाणी*

*७. हे खावे - ज्वारी, बाजरी, नाचणी, लोणी काढलेले ताजे ताक, हळद घातलेले दूध(देशी गाईचे उत्तम, मिळत नसेल तर म्हशीचे पण जर्सी, होस्टन वगैरेचे अजिबात नको.),  फिल्टर्ड शेंगतेल, गवळ्याकडील प्रक्रिया न केलेले दूध, सर्व भारतीय भाज्या आणि फळं, सात्विक अन्न, देशी गाईचे किंवा म्हशीच्या दुधापासून घरी केलेले तूप, पारंपारिक पध्दतीने शिजवलेला भात*

*८. Cap. Flax seed +
     Cap. Glucosamine +   
     Cap. Arthrohills
     Arthrohills Ultra oil
या कशा घ्यायच्या ते सोबत  लिहून पाठवतो. 

९. वेगवान वाहने, दूरचे सारखे प्रवास, जाग्रणे, बाहेरचे साऱखे खाणे, एकाच जागी बसून राहणे किंवा सतत उभे राहणे असे प्रकार टाळावेत.

१०. सकाळी ब्रश झाल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात चहाच्या चमच्याने पाव चमचा हळद घालून प्यावे. नंतर दहा मिनिटांनी १२ सूर्यनमस्कार घालावेत.

*याप्रमाणे उपचार सलग किमान तीन महिने करावेत. तरीही फरक पडला नाही तर प्रत्यक्ष भेटावे

डॉ. आनंद वामन कुलकर्णी
                        D.Y.N.D.
निसर्गोपचार, योग, आहार तज्ज्ञ
जयसिंगपूर - ४१६१०१
मोबाईल - 774496अ


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शिलाजीत - औषधही ... नैसर्गिक टॉनिकही

शिलाजित, ज्याला मुमिजो किंवा मिनरल पिच असेही म्हणतात, हा हिमालय, तिबेट आणि अल्ताई पर्वताच्या उंच प्रदेशात आढळणारा एक नैसर्गिक पदार्थ आहे.  ह...