Translate

शुक्रवार, ७ एप्रिल, २०२३

प्रचंड ताकद वाढवणारा दगड - शिलाजीत

शिलाजीत हे नाव तुम्ही ऐकले असेलच. शिलाजीत म्हटल्यावर दचकलात ना ? खरंच आहे, प्रसार माध्यमातून प्रसिध्द झालेल्या जाहिरातींमुळे शिलाजीतचा एकच उपयोग आपल्याला माहिती आहे. त्यामुळेच तर कुणी शिलाजीत घेतय म्हटलं की आपल्या भुवया वर जातात.  पण लैंगिक क्षमता वाढवणारे औषध एवढीच शिलाजीतची ओळख नाही. खरं तर या अपप्रचाराने आयुर्वेदातील एक चांगली औषधी उपेक्षित राहिली असेच म्हणावे लागेल.

न सोsस्ति रोगो भुवि साध्यरुपो
जत्त्वश्मजं यं न जयेत्प्रयुक्तं
तत्काल योगैर्विधिवत्प्रयुक्तं
स्वस्थस्य चोर्जा विपुलां दधाति ।।१४३।।

   महर्षि वाग्भटजीनीं त्यांच्या अष्टांगह्रदयम् या ग्रंथातील  उत्तरस्थानाच्या, अध्याय ३९ मध्ये वरील श्लोकातून शिलाजीताची उपयुक्तता अधोरेखित केली आहे. शिलाजीताने बरा होणार नाही असा जगात साध्य रोगच नाही असे सांगून ते या श्लोकात म्हणतात, निरोगी मनुष्यास तर योग्य रीतिने घेतल्यास याने फार शक्ती येते.

हे वाचून शिलाजीताविषयीचा मनातील संभ्रम दूर झाला असेलच.  आता शिलाजीत विषयी सविस्तर माहिती पाहू –

शिलाजीत हा हिमालयातील खडकातून पाझरणारा पदार्थ आहे. बाभळीच्या झाडातून जसा डिंक पाझरतो तसा उष्णता वाढली की हिमालयातील दगडातून हे शिलाजीत पाझरते. ते जमा करुन त्याचे आयुर्वेदिक ग्रंथात सांगितलेल्या प्रक्रियेने शुध्दीकरण केले जाते. त्यानंतर शिलाजीत खाण्यासाठी योग्य होते. पूर्ण नैसर्गिक आणि शुध्द शिलाजीत ओळखण्याच्या दोन सोप्या कसोट्या आहेत. पहिली म्हणजे त्याला गोमूत्रासारखा वास येतो आणि त्याचा रंग काळा असतो. दुसरी म्हणजे कोमट दुधात किंवा पाण्यात ते पूर्ण विरघळते.

शिलाजीतचे गुण – शिलाजीत समशितोष्ण आहे. म्हणजे ते उष्णही नाही आणि थंडही नाही. अधिक प्रमाणात किंवा चुकीच्या पध्दतीने घेतले तर मात्र त्याचा स्वभाव थोडा उष्ण जाणवतो. ते कडू, तिखट आणि तुरट चवीचे असते.

अशा या शुध्द स्वरुपातील शिलाजीतचे उपयोग पाहू –

१.    धातूंचे पोषण – आपले शरीर हे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र या सात धातूंनी बनलेले आहे. जेव्हा हे सातही धातू चांगले असतात तेव्हा शरीर सुदृढ असते. कोणतेही औषध जेव्हा धातूंची पुष्टी करते तेव्हा ते याच क्रमाने करीत असते. शिलाजीत ही तसेच सगळ्या धातूंची पुष्टी करते आणि शेवटी शुक्र धातू बलवान करते. त्यामुळे शिलाजीतने केवळ लैगिक सामर्थ्यच वाढते असे नाही तर शिलाजीतमुळे सगळे शरीरच बलवान होते. लैंगिक सामर्थ्य वाढणे हा शिलाजीतच्या अनेक उपयोगांमधील एक उपयोग आहे. लैंगिक सामर्थ्य वाढविण्यासाठी या सोबत अश्वगंधा आणि सफेद मुसळी घेतल्यास अधिक चांगला फायदा दिसतो.

२.    डायबेटिस – मेह, प्रमेह, मधुमेह अर्थात डायबेटिसमध्ये शरीराची झीज मोठ्या प्रमाणात होते. शिलाजीत ती झीज भरुन काढते आणि पेशींची ताकद  वाढविते. शिलाजीतमुळे रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रीत राहते. मधुमेहामुळे येणारा थकवा, निरुत्साह, अधिक झोप यासारखा त्रास कमी होतो. आचार्य वाग्भट महर्षिनी त्यांच्या अष्टांगह्रदयम ग्रंथाच्या चिकित्सास्थानातील बाराव्या अध्यायात खालील श्लोक लिहिला आहे.

मधुमेहित्वमापन्नो भिषरिभः परिवर्जिताः ।
शिलाजतुतुलामद्या त्प्रमेहार्तः पुनर्नवः ।।४२।।

आयुर्वेदात मधुमेहाचे वीस प्रकार सांगितले आहेत. ज्याचे मूत्र हे मधासारखे जाड, गोड आणि मधाच्या रंगाचे होते त्याला आयुर्वेदात मधुमेह म्हटले आहे आणि तो असाध्य म्हटला आहे. त्यापूर्वीच्या अवस्थांना मेह, प्रमेह अशा संज्ञा देण्यात आल्या आहेत.  वरील श्लोकात ज्याचा मेह मधुमेहत्व पावला आणि ज्याच्यावर उपचार करण्याचे वैद्याने साडून दिले आहे, असा रुग्णही शिलाजीताच्या योग्य वापर केल्यास पुन्हा अगदी नवा होतो, असे महर्षि वाग्भट यांनी म्हटले आहे.

३.    पित्तामुळे येणारा अशक्तपणा – अँसिडिटीमुळे जेवणावर परिणाम होतो. त्यामुळे धातूंचा क्षय होतो. अशा स्थितीत हा क्षय शिलाजीतमुळे भरुन निघतो.

४.    मूतखडा -  शिलाजीत हे मूत्रवहन संस्थेतील विकारात उत्तम फायदा देते. शिलाजीत दगड फोडून बाहेर येत असल्याने फोडणे हा त्याचा गुणधर्म मूतखड्यातही उपयुक्त आहे. फक्त हा उपाय तज्ज्ञाच्या मार्गदर्शनात करावा.

५.    अकाली वृध्दत्व – अनेकजणांच्याबाबत स्ध्या हे आढळते. वयापेक्षा अधिक म्हातारे दिसण्याला अकाली वृध्दत्व म्हणतात. शिलाजीतच्या उपयोगाने यावर मात करता येते. अकाली केस पांढरे होणे, केस गळणे यावरही शिलाजीत प्रभावी आहे.

६.    दमा / अस्थमा – दमा किंवा अस्थमा हा आजार शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे होतो. शिलाजीत सप्तधातूंना बलकटी देत असल्याने शरीर बलवान बनते आणि रोग प्रतिकारक शक्ती बळकट होऊन दमा आणि अस्थम्यात आराम मिळतो.

७.    मेंदूचे टॉनिक – शिलाजीत हे मेंदूचे टॉनिक आहे. त्यामुळे सतत बौध्दिक काम करणा-यांना थकलेल्या मेंदूला संजीवनी देण्यासाठी उपयुक्त आहे. विस्मरणाच्या त्रासातही शिलाजीत फायदेशीर आहे.

८.    दोन प्रकारच्या मूळव्याधी असतात. यातील ज्या मूळव्याधीत रक्त पडत नाही त्या मूळव्याधीत शिलाजीतचा चांगला फायदा होतो.

९.    अकाली केस पांढरे होणे, गळणे अशा विकारातही शिलाजीत फायद्याचे ठरते. 

१०.   शिलाजीत हे विविध नैसर्गिक घटकांनी परिपूर्ण आहे. शरीराला आवश्यक असणारे अनेक घटक शिलाजीतमध्ये नैसर्गिक स्वरुपात असतात. त्यामुळे शिलाजीत हे उत्तम टॉनिक म्हणूनही उपयुक्त आहे.

शिलाजीतचे आयुर्वेदाच्या विविध ग्रंथात खूप उपयोग सांगितले आहेत. याशिवाय विविध आयुर्वेदिक औषधांच्या सोबत शिलाजीत घेतल्याने मिळणारे फायदेही खूप आहेत. हे सगळे इथे लिहिले तर खूपच मोठा विस्तार होईल. थोडक्यात सांगायचे तर विविध आजारात औषध म्हणून तर काहीही झालेले नसेल तर टॉनिक म्हणून शिलाजीत सगळ्यांनाच उपयुक्त आहे.

असे हे मौल्यवान शिलाजीत शंभर टक्के नैसर्गिक आणि शुध्द स्वरुपात आम्ही गेली पाच वर्षे उपलब्ध करुन देत आहोत. तुमच्या पत्त्यावर ते कुरिअरने पाठवण्याचीही व्यवस्था आहे. शिलाजीतची डबी २० ग्रॅमची असते. एवढेसे शिलाजीत एका व्यक्तीला साधारण दोन महिने पुरते. वीस ग्रॅमच्या या डबीची किंमत मात्र फक्त १०५० रुपये आहे. तुम्ही आपल्या ऑनलाईन स्टोअरवरुनही शिलाजीत खरेदी करु शकता. स्टोअरची लिंक -

https://anandkulkarni.in

अथवा शिलाजीत ऑर्डर करण्याच्या अन्य प्रक्रियेसाठी माझ्या व्हॉटसअॅप वर शिलाजीत असा मेसेज करावा.
आपला
डॉ.आनंद वामन कुलकर्णी (D.Y.N.D.)
निसर्गोपचार, योग, आहार तज्ज्ञ
जयसिंगपूर – ४१६१०१
मोबाईल / व्हॉटस अँप  - 7744964550

बुधवार, ५ एप्रिल, २०२३

मधुमेह - रक्त शर्करेबरोबरच रुग्णालाही नॉर्मल करणारा उपचार

मधुमेहात रक्त शर्करा औषधानी नॉर्मल होईल. पण, रुग्ण नॉर्मल होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दिनचर्येवर लक्ष देणे आवश्यक आहे. या दृष्टीने खालील उपचार सुचवित आहे.

१. सकाळी ब्रश झाल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात दोन चिमूट हळद टाकून प्यावे.

२. नंतर सूर्योदयाच्या सुमारास नेहमीच्या गतीने किमान तीन किलोमीटर चालण्याचा व्यायाम करावा.

३. नंतर खुर्चीत मागे टेकून बसावे. दीर्घ श्वास घ्यावा आणि कमरेत वाकून दोन्ही गुडघ्यांच्या बाहेरील बाजूने हात घेवून पायाचे अंगठे धरावेत. या स्थितीत जितके शक्य आहे तेवढा वेळ थांबावे. नंतर पुन्हा मूळ स्थितीत यावे. सहा पासून सुरुवात करुन रोज एकने वाढवत ही कृती २१ वेळा करावी.

४. सकाळचे जेवण १० ते ११ च्या दरम्यान आणि रात्रीचे सूर्यास्तापूर्वी घ्यावे. सकाळच्या निम्मा आहार रात्री घ्यावा. जेवणापूर्वी एक तास आणि जेवणानंतर एक तास पाणी पिऊ नये.

५. हे खाऊ नये - गहू, दही, साखर, बेकरीचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ, थंड पेय, थंड पदार्थ, आईस्क्रिम, दुग्धजन्य पदार्थ, पनीर, फास्ट फूड, जंक फूड, हॉटेलचे पदार्थ, पाश्चराईज्ड पॉलीबॅगमधील दूध, रिफाईंड तेल, मिठाई, विदेशी पदार्थ आणि फळ

६. हे खावे - ज्वारी, बाजरी, नाचणी, लोणी काढलेले ताजे ताक, फिल्टर्ड शेंगतेल, कसलीही प्रक्रिया न केलेले दूध (गवळ्याकडील दूध घरी तापवावे), पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य, देशी फळं, भेंडी, मेथी, मुळा, हळद

७. Cap. Karela Jamun
    Tab. Diabohills
     Shuddha Shilajeet
    Cap. Amalaki / Tab.         Amala
या कशा घ्यायच्या ते पाठवताना लिहून देतो.

८. रात्री झोपण्यापूर्वी दहा मिनिटे अनुलोम विलोम प्राणायाम, ध्यान करावे.

९. रात्री १० नंतर जागू नये आणि सकाळी ६ नंतर झोपू नये. दुपारी अजिबात झोपू नये.

१०. सूर्यास्तानंतर काही खाऊ नये. आवश्यक नसेल तर पाणीही पिऊ नये.

या दशसूत्रीचा वापर केल्यास रक्तातील साखर नॉर्मल राहिलच पण, रुग्णही नॉर्मल होईल.

महत्त्वाचे - हे उपचार करताना डॉक्टरांनी दिलेली औषधे सुरु ठेवावीत. पंधरा दिवसांनी रक्तशर्करा तपासून तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांच्या औषधांबाबत निर्णय घ्यावा. डॉक्टरांची औषधे परस्पर बंद करणे, त्याचा डोस बदलणे धोकादायक ठरु शकते.

वर दिलेली औषधे खालील लिंकवर क्लिक करुन तुम्ही आपल्या ऑनलाईन स्टोअरवरून घर पोहोच मागवू शकता.
https://anandkulkarni.In

डॉ. आनंद वामन कुलकर्णी
                        D.Y.N.D.
निसर्गोपचार, योग, आहार तज्ज्ञ
जयसिंगपूर - ४१६१०१
मोबाईल - 7744964550

गुरुवार, ३० मार्च, २०२३

औषधपण....टॉनिकपण ....!! - रसायन चूर्ण

 गुडुची, गोक्षूर आणि आवळा या तीन पारंपारिक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहेत, ज्या त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी शतकानुशतके वापरल्या जात आहेत. या औषधी वनस्पतींचे वैयक्तिकरित्या स्वतंत्र असे विविध आरोग्य फायदे आहेत, परंतू जेव्हा या तिन्ही औषधी एकत्र मिसळल्या जातात, तेव्हा हे चूर्ण अनेक आजारांवर एक शक्तिशाली उपाय करणारे बहुआयामी चूर्ण ठरते..

 गुडुची, ज्याला टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया देखील म्हणतात, ही एक शक्तिशाली औषधी वनस्पती आहे, जी सामान्यतः ताप, मधुमेह आणि त्वचा विकार यासारख्या विविध आजारांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते. ही वनस्पती त्याच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या गुणधर्मांसाठी देखील ओळखली जाते, सर्दी आणि फ्लू सारख्या श्वसन संक्रमणांवर उपचार करण्यासाठीही ती प्रभावी आहे.

 गोक्षूर, ज्याला ट्रायबुलस टेरेस्ट्रिस असेही म्हणतात, ही आणखी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जी त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी शतकानुशतके वापरली जात आहे. त्यात लघवीचे प्रमाण वाढवणारा गुणधर्म आहे. मूत्रमार्गातील संक्रमण, मूत्रपिंडातील दगड आणि इतर संबंधीत व्याधींवर उपचार करण्यासाठी ते वापरले जाते. हे कामवासना वाढवण्यासाठी आणि लैंगिक समस्यांवर उपचार करण्यासाठी देखील वापरले जाते.

 आवळा, ज्याला भारतीय गूसबेरी असेही म्हणतात, हे व्हिटॅमिन सी आणि इतर अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत आहे. हे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि निरोगी त्वचा आणि केसांना प्रोत्साहन देण्यासाठी वापरले जाते. हे श्वसन संक्रमणांवर उपचार करण्यासाठी देखील वापरले जाते आणि मधुमेह आणि हृदयरोग नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरते.

 जेव्हा या तीन औषधी वनस्पती समान प्रमाणात एकत्र केल्या जातात तेव्हा ते एक शक्तिशाली टॉनिक तयार होते, जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास, निरोगी पचनास प्रोत्साहन देण्यासाठी आणि श्वसन संक्रमण, मूत्रमार्गात संक्रमण आणि लैंगिक बिघडलेले कार्य यांसारख्या अनेक परिस्थितींवर उपचार करण्यास उपयुक्त ठरते.

 मिश्रण तयार करण्यासाठी गुडुची, गोक्षूर आणि आवळा पावडर समान प्रमाणात घ्या आणि ते एकत्र मिसळा. एक चमचे हे मिश्रण दिवसातून दोनदा मध आणि तुला सोबत घ्यायचे असते. अर्थात डोस व्यक्तीच्या गरजा आणि स्थितीच्या तीव्रतेनुसार समायोजित केला जाऊ शकतो.

 शेवटी, गुडुची, गोक्षूर आणि आवळा पावडर मिश्रण हा एक शक्तिशाली उपाय आहे, ज्याचा उपयोग विविध आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो.  

ही तिन्ही चूर्णे आपल्या ऑनलाईन स्टोअरवरून तुम्ही घरपोहोच मिळवू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन तुमची ऑर्डर प्लेस करा.

https://anandkulkarni.in

डॉ. आनंद वामन कुलकर्णी
                        D.Y.N.D.
निसर्गोपचार, योग, आहार तज्ज्ञ
जयसिंगपूर - ४१६१०१
मोबाईल - 7744964550

मंगळवार, २८ मार्च, २०२३

सोरायसिस आणि विविध त्वचा रोगांसाठी नैसर्गिक उपाय -

१. कोणतेही साबण, शाम्पू वापरु नये. हरभऱ्याच्या डाळीचे पीठ दुधात कालवून ते अंगाला लावावे आणि स्नान करावे. देशी गाईचे दूध मिळाले तर उत्तमच. नसेल तर म्हशीचे वापरावे पण जर्सी चे अजिबात नको.

२.आंबेहळद दुधाच्या साईत कालवून रात्री झोपताना लावावी.

३. Cap. Neem
    Cap. Aloe Vera
    Cap. Aamalaki
    Cap. Haridra
या कशा घ्यायच्या ते पाठवताना लिहून देतो.

४. आठवड्यातून एकदा रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे एरंडेल तेल टाकून प्यावे. त्यानंतर तीन दिवसांनी एक दिवसाचा पूर्ण उपवास करावा. उपवासाच्या दिवशी फक्त पाणी आणि जिऱ्याची फोडणी दिलेले ताजे ताक दर दोन तासांनी एक एक ग्लास प्यावे.

५. गहू, तूर डाळ, मैद्याचे पदार्थ, आंबट व आंबवलेले पदार्थ, शिळे, फ्रिजमधील पदार्थ, मसालेदार आणि तेलकट पदार्थ, बेकरीचे पदार्थ, मांसाहार, दूध दही आणि फळांचे एकत्र सेवन, आंबाडी अजिबात खाऊ नये.

६. फळ, फळभाज्या यांचा आहारात भरपूर समावेश असावा.

७. आंघोळीच्या एक बादली पाण्यात एक ग्लास याप्रमाणे ताजे गोमूत्र मिसळावे. उपलब्ध नसेल तर गोमूत्र अर्क वापरला तरी चालेल.

८. रोज सकाळी सूर्योदयाच्या सुमारास साधारण ४ कि.मी. चालावे किंवा २४ सूर्यनमस्कार घालावेत.

९. कडक ऊनापासून त्वचेचे रक्षण करावे. जाग्रण करु नये. पचन बिघडेल असे काही करु नये.

१०. सकाळचे जेवण दहापूर्वी आणि रात्रीचे सात ते आठच्या दरम्यान घ्यावे.

डॉ. आनंद वामन कुलकर्णी
                        D.Y.N.D.
निसर्गोपचार, योग, आहार तज्ज्ञ
जयसिंगपूर - ४१६१०१
मोबाईल - 7744964550

गुडघे दुखी, सांधे दुखी, संधीवातासाठी नैसर्गिक उपचार

१. आठवड्यातून तीन वेळा सकाळी संपूर्ण शरीराला तिळाच्या तेलाने हलके मालिश करावे. नंतर कोमट पाण्याने स्नान करावे.

२. रोज रात्री झोपताना दुखणाऱ्या सांध्याना खाली सुचवलेले तेल लावून हलक्या हाताने चोळून जिरवावे. यानंतर वाऱ्यात अजिबात जावू नये.

३. सकाळचे जेवण ११ पूर्वी आणि रात्रीचे सूर्यास्तापूर्वी करावे. दुपारी भूक लागली तर हलका नाष्टा किंवा फलाहार घ्यावा. सकाळच्या निम्मा आहार रात्री घ्यावा.

४. जेवणानंतर लगेच झोपू नये. दुपारी झोपू नये. रात्री ११ पूर्वी झोपावे आणि पहाटे ५ वाजता उठावे.

५. आठवड्यातून तीन वेळा रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे तूप घालून प्यावे.

*६. हे खाऊ नये - गहू, वांगी, मैदा आणि मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड, पाश्चात्य फळे आणि खाद्यपदार्थ, दही, दूध नासवून बनवलेले पदार्थ, रिफाईंड तेल, पाश्चराईज्ड पॉलीबॅगमधील दूध, हवाबंद डब्यातील पदार्थ, थंड पेय व पदार्थ, आईस्क्रिम, मसालेदार, चमचमीत पदार्थ, प्रेशर कुकरचा भात, अॅल्युमिनियमच्या भांड्यात ठेवलेले किंवा शिजवलेले अन्न पदार्थ, फ्रिजमधील अन्न आणि पाणी*

*७. हे खावे - ज्वारी, बाजरी, नाचणी, लोणी काढलेले ताजे ताक, हळद घातलेले दूध(देशी गाईचे उत्तम, मिळत नसेल तर म्हशीचे पण जर्सी, होस्टन वगैरेचे अजिबात नको.),  फिल्टर्ड शेंगतेल, गवळ्याकडील प्रक्रिया न केलेले दूध, सर्व भारतीय भाज्या आणि फळं, सात्विक अन्न, देशी गाईचे किंवा म्हशीच्या दुधापासून घरी केलेले तूप, पारंपारिक पध्दतीने शिजवलेला भात*

*८. Cap. Flax seed +
     Cap. Glucosamine +   
     Cap. Arthrohills
     Arthrohills Ultra oil
या कशा घ्यायच्या ते सोबत  लिहून पाठवतो. 

९. वेगवान वाहने, दूरचे सारखे प्रवास, जाग्रणे, बाहेरचे साऱखे खाणे, एकाच जागी बसून राहणे किंवा सतत उभे राहणे असे प्रकार टाळावेत.

१०. सकाळी ब्रश झाल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात चहाच्या चमच्याने पाव चमचा हळद घालून प्यावे. नंतर दहा मिनिटांनी १२ सूर्यनमस्कार घालावेत.

*याप्रमाणे उपचार सलग किमान तीन महिने करावेत. तरीही फरक पडला नाही तर प्रत्यक्ष भेटावे

डॉ. आनंद वामन कुलकर्णी
                        D.Y.N.D.
निसर्गोपचार, योग, आहार तज्ज्ञ
जयसिंगपूर - ४१६१०१
मोबाईल - 774496अ


सोमवार, २७ मार्च, २०२३

सायटिका व मणक्याच्या विकारांसाठी नैसर्गिक उपचार -

१. सकाळी ब्रश झाल्यावर एक ग्लास कोमट पाण्यातून चहाच्या चमच्याने पाव चमचा हळद घ्यावी. नंतर अर्धा तास काही सेवन करु नये.

२. या काळात किमान दोन किलोमीटर नेहमीच्या गतीने चालण्याचा व्यायाम करावा.

३. सकाळचे जेवण ११ पूर्वी व रात्रीचे ८ पूर्वी घ्यावे. जेवणापूर्वी एक तास आणि नंतर एक तास पाणी पिऊ नये. जेवताना घोट, घोट पाणी प्याले तरी चालेल.

४. रात्री ११ पूर्वी झोपावे आणि सकाळी ७ पूर्वी उठावे.

५. आठवड्यातून एकदा रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात चार चमचे तूप घालून प्यावे. 

६. दररोज रात्री झोपताना आणि सकाळी आंघोळीच्या आधी एक तास कंबर आणि दोन्ही पायांना खाली सांगितलेले  तेल लावून हलक्या हाताने चोळून जिरवावे. आंघोळ नेहमी कोमट पाण्यानेच करावी.

७. हे खाऊ नये - गहू, दही, मैदा, आंबवलेले पदार्थ, दूध नासवून बनवलेले पदार्थ, वांगी, बटाटा, रिफाईंड तेल, पालेभाजी, मोड आलेली कडधान्ये, शिळे अन्न, थंड पेय व थंड पदार्थ, फास्ट आणि जंक फूड, हॉटेलचे पदार्थ, मांसाहार

८. हे खावे - ज्वारी, बाजरी, नाचणी, जुना तांदूळ, लोणी काढलेले ताजे ताक चिमूटभर सुंठपूड घालून, फळभाज्या, भारतीय फळ, ताजे व घरचे अन्न, लाकडी घाण्याचे किंवा फिल्टर्ड शेंगदाणा तेल, भाजलेल्या कडधान्यांच्या उसळी, कोमट अन्न आणि पाणी, तूप, सकाळी आणि रात्रीच्या जेवणात चार चार चमचे कच्चे तेल, लसूण, आलं, मुळा, दूध

९. Cap. Flax Seed oil
    Cap. Glucosamine
    Cap. Moringa
   Cap. Arthrohills
   Arthrohills Ultra oil
या कशा घ्यायच्या ते पाठवताना सोबत लिहून पाठवतो.

१०. हे टाळावे -  कमरेतून वाकणे, वेगवान वाहनातून प्रवास, दुचाकी, रिक्षा, बस याद्वारे प्रवास, एकाच टप्प्यात ५० किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास, एकाच जागी बसून राहणे किंवा अधिक काळ उभे राहणे, वजनदार वस्तू उचलणे किंवा ढकलणे, ओढणे, धावपळ, कंबर व पायावर ताण येईल अशी कामे किंवा अतिकाम

डॉ. आनंद वामन कुलकर्णी
                        D.Y.N.D.
निसर्गोपचार, योग, आहार तज्ज्ञ
जयसिंगपूर - ४१६१०१
मोबाईल - 7744964550

केस गळती, केसांच्या विविध समस्यांवर निसर्गोपचार -

१.जाहिरातीतील दावे खरे मानून कुठलाही शाम्पू अथवा तेल केसांना लावू नये. या समस्येसाठी वरच्या उपायांइतकाच पोटाचे आरोग्य सुधारणारा उपचारही तितकाच महत्वाचा आहे.

२. आंघोळीच्या  वेळेस केसांना शिकेकाई पूड लावावी. आंघोळीच्या नंतर साधे फिल्टर्ड खोबरेल तेल (पॅराशूट वगैरे नव्हे) केसांना लावावे आणि चांगले चोळून जिरवावे.

३. सकाळी ब्रश झाल्यावर १ चमचा आवळा चूर्ण एक ग्लास  कोमट पाण्यासोबत घ्यावे.

३. हे खाऊ नये - खारवलेले पदार्थ, चटपटीत व मसालेदार पदार्थ, फास्ट फूड, बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, दही, आंबट आणि आंबवलेले पदार्थ

४. सकाळचे जेवण ११ पूर्वी आणि रात्रीचे सूर्यास्तापूर्वी करावे.

५. Cap. Wheat Grass
     Cap. Aloe Vera
     Tab. Triphala
      Tab. Shatawari
या कशा घ्यायच्या ते पाठवताना लिहून देतो.

६. जाग्रण टाळावे, सकाळी उशीरा पर्यंत झोपणे, दुपारी झोपणे टाळावे.

७. केसांना कलप लावू नये. अगदीच गरज असेल तर महूरी हिना मेहेंदी लावावी.

८. केसात कोंडा किंवा खपल्या होत असतील तर आठवड्यातून तीनदा सकाळी डोक्याला लिंबाचा रस लावावा. नंतर पंधरा मिनिटांनी आंघोळ करावी.

याप्रमाणे किमान तीन महिने उपाय करावा. त्यानंतरही समस्या कायम राहिली तर प्रत्यक्ष भेटावे.
डॉ. आनंद वामन कुलकर्णी
                        D.Y.N.D.
निसर्गोपचार, योग, आहार तज्ज्ञ
जयसिंगपूर - ४१६१०१
मोबाईल - 7744964550

शनिवार, २५ मार्च, २०२३

शतकानुशतकांचे शक्तीशाली औषध- देशी गाईचे तूप

गाईचे तूप, ज्याला कढवलेले  लोणी असेही म्हटले जाते, हे भारतीय पाककृतीमधील एक मुख्य पदार्थ आहे. ते त्याच्या समृद्ध, खमंग चवीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.  स्वयंपाकासाठी वापरण्या व्यतिरिक्त, गाईचे तूप शतकानुशतके भारतात औषधी हेतूंसाठी वापरले जात आहे.  विशेषत: देशी गाईचे तूप  आरोग्याच्या फायद्यासाठी बहुमोल ठरले आहे.

 देशी गायी मूळच्या भारतातील आहेत आणि त्या पाठीवर मानेजवळ असलेल्या वशिंडामुळे  ओळखल्या जातात.  गाईला हिंदू संस्कृतीत पवित्र मानले जाते. ती परमात्म्याचा अवतार मानला जाते.   या गायींच्या दुधापासून बनविलेले  तूप विशेष शक्तिशाली असल्याचे म्हटले जाते.  आयुर्वेदिक औषधांमध्ये ते वापरले जाते, ही एक प्राचीन भारतीय उपचार प्रणाली आहे.

 देशी गाईच्या तुपाचे काही औषधी उपयोग येथे दिले आहेत - 

 पचनास प्रोत्साहन देते: - गायीचे तूप पाचक एन्झाईम्सचे उत्पादन  करण्यासाठी ओळखले जाते, जे अन्न पचन करण्यास मदत करू शकते.  असे मानले जाते की ते  पोषक तत्वांचे शोषण करण्यास प्रोत्साहन देते.

 रोगप्रतिकारक शक्ती वाढवते:- गाईच्या तुपात अँटिऑक्सिडंट्स आणि इतर संयुगे असतात जी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.  हे विशेषतः कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी किंवा आजारातून बरे झालेल्यांसाठी फायदेशीर आहे.

 जखमा बरे करते:-  गाईच्या तुपात जंतुनाशक गुणधर्म असतात आणि जखमांवर  लावल्यास त्या लवकर बरे होतात.  हे जळजळ कमी करते आणि ऊतकांच्या पुनरुत्पादनास प्रोत्साहन देते.

 बद्धकोष्ठता दूर करते:-  गाईचे तूप एक नैसर्गिक रेचक आहे आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते.  आतड्याच्या हालचालींना चालना देण्यासाठी झोपेच्या आधी कोमट पाण्यासोबत थोडेसे तूप खाण्याची शिफारस केली जाते.

 त्वचेचे आरोग्य सुधारते:-  गाईचे तूप त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी आणि कोरडेपणा टाळण्यासाठी वापरले जाते.  त्यात वृद्धत्व विरोधी गुणधर्म देखील आहेत त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यात मदत करते.

 मेंदूचे कार्य सुधारते:-  गाईचे तूप ओमेगा -3 फॅटी ऍसिड आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध आहे जे मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करू शकतात.  हे स्मृती, एकाग्रता आणि संज्ञानात्मक कार्य वाढवते.

 हार्मोन्स संतुलित करते:- गाईचे तूप शरीरातील हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करते, विशेषत: स्त्रियांमध्ये.  रजोनिवृत्तीतून जात असलेल्या किंवा हार्मोनल असंतुलन असलेल्या स्त्रियांसाठी हे विशेषतः फायदेशीर ठरू शकते.

 शेवटी, देशी गाईचे तूप त्याच्या आरोग्याच्या फायद्यासाठी शतकानुशतके वापरले जात आहे.  आयुर्वेदिक औषधांमध्ये पचनशक्ती वाढवणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, जखमा बरे करणे, बद्धकोष्ठता दूर करणे, त्वचेचे आरोग्य सुधारणे, मेंदूचे कार्य वाढवणे आणि हार्मोन्स संतुलित करणे यासाठी त्याचे विशेष महत्त्व आहे.  

देशी गाईचे शंभर टक्के शुध्द आणि गावरान पध्दतीने बनविलेले खात्रीशीर तूप आम्ही उपलब्ध करुन देत असतो. आपल्या ऑनलाईन स्टोअरवरून तुम्ही ते ऑर्डर करु शकता. लिंक खाली दिली आहे. तुम्हाला तूप कुरियरने घरपोहोच मिळेल.
https://anandkulkarni.In

डॉ. आनंद वामन कुलकर्णी
                        D.Y.N.D.
निसर्गोपचार, योग, आहार तज्ज्ञ
जयसिंगपूर - ४१६१०१
मोबाईल - 7744964550

मधुमेहासह विविध आजारांवर फळ - भाजी औषध - करेला - जामून

कारला, ज्याला करेला असेही म्हणतात, ही एक उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय वेल आहे जी कुकरबिट्सच्या कुटुंबाशी संबंधित आहे.  हे फळ आशिया, आफ्रिका आणि कॅरिबियनमध्ये मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, जे अनेक पाककृतींमध्ये भाजी म्हणून वापरले जाते.  तिखट कडू चवीसाठी ओळखले जाते आणि या कारणास्तव अनेकांना ते आवडत नाही.  तथापि, हे शतकानुशतके औषधी हेतूंसाठी वापरले जात आहे आणि त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत.

 कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फॉलिक असिड आणि पोटॅशियम यांसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.  यात चारेंटिन, मोमोर्डिसिन आणि व्हिसिन सारख्या विविध जैव सक्रिय संयुगे देखील आहेत, ज्यात अँटिऑक्सिडेंट, अँटीडायबेटिक आणि कॅन्सर विरोधी गुणधर्म आहेत.

 कारल्याचे काही औषधी उपयोग येथे आहेत. - 

 मधुमेहाचे व्यवस्थापन: -  कारल्यामध्ये हायपोग्लायसेमिक गुणधर्म आहेत., याचा अर्थ ते मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते.  त्यात चरेंटिन नावाचे संयुग असते, ज्याचा रक्तातील ग्लुकोज-कमी करणारा प्रभाव असल्याचे मानले जाते.  कारले इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यास आणि इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करण्यास देखील मदत करते, ज्यामुळे ते मधुमेहाच्या व्यवस्थापनात एक उपयुक्त साधन बनते.

 पाचक आरोग्य: - बद्धकोष्ठता, अपचन आणि अतिसार यांसारख्या पाचन विकारांवर उपचार करण्यासाठी कारल्याचा वापर पारंपारिकपणे केला जातो.  पाचक एंझाइम्सचा स्राव वाढवून आणि पचनमार्गात जळजळ कमी करून पचन सुधारण्यास मदत होते.

 रोगप्रतिकारक शक्ती वाढवते: - कारल्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात.  त्यात विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात जी रोगप्रतिकारक शक्तीच्या कार्यासाठी महत्त्वपूर्ण असतात, जसे की व्हिटॅमिन सी आणि जस्त.

 त्वचेचे आरोग्य: - कारल्यामध्ये अँटिऑक्सिडेंट सामग्रीमुळे त्वचेला बरे करण्याचे गुणधर्म असतात.  असे मानले जाते की ते जळजळ कमी करण्यास आणि जखमेच्या उपचारांना चालना देण्यास मदत करते, ज्यामुळे ते एक्जिमा आणि सोरायसिस सारख्या त्वचेच्या स्थितीसाठी एक उपयुक्त नैसर्गिक उपाय बनते.

 कर्करोग प्रतिबंध:  - कारल्यामध्ये विविध प्रकारची बायोएक्टिव्ह संयुगे असतात, ज्यात कर्करोगविरोधी गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे.  ही संयुगे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास आणि ट्यूमरची निर्मिती रोखण्यास मदत करतात.

 शेवटी, कारले ही एक बहुमुखी भाजी आहे ज्यामध्ये अनेक औषधी उपयोग आहेत.  पारंपारिक औषधांमध्ये शतकानुशतके विविध आरोग्य परिस्थितींवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जात आहे आणि आधुनिक संशोधनाने त्याच्या अनेक आरोग्य फायद्यांची पुष्टी केली आहे.  
----------–---–---------–-----------–------------------------
जामुन किंवा भारतीय ब्लॅकबेरी हे एक फळ आहे जे भारत आणि आशियातील इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.  तथापि, जामुन फळाच्या बिया, ज्याला जामुन बीज म्हणूनही ओळखले जाते, त्यामध्ये असंख्य औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे ते पारंपारिक औषधांमध्ये एक मौल्यवान घटक बनतात हे अनेकांना माहीत नाही.  या लेखात आपण जामुन बीजाचे औषधी उपयोग आणि ते आपल्या आरोग्याला कसे फायदेशीर ठरू शकते याबद्दल चर्चा करू.

 मधुमेह नियंत्रित करा: - जामुन बीज त्याच्या मधुमेहविरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते आणि ते सामान्यतः मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी वापरले जाते.  बियामध्ये जॅम्बोलिन नावाचे संयुग असते, जे स्टार्चचे ग्लुकोजमध्ये रूपांतर रोखून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.  जामुन बीज पावडर किंवा जामुन बियांचे पाणी प्यायल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते.

 पचन सुधारते: - जामुन बीज त्याच्या पाचक गुणधर्मांसाठी देखील ओळखले जाते.  हे पचन सुधारण्यास, बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते.  हे पाचक एन्झाईम्सचे उत्पादन वाढवण्यास देखील मदत करते, जे अन्न पचन करण्यास मदत करते.

 रोगप्रतिकारशक्ती वाढवते:- जामुन बीज व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्त्रोत आहे, जो रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक आहे.  हे पांढऱ्या रक्त पेशींच्या निर्मितीमध्ये मदत करते, जे संक्रमण आणि रोगांशी लढण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.  जामुन बीजचे नियमित सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते.

 श्वासोच्छवासाच्या समस्यांपासून आराम मिळतो: - अस्थमा आणि ब्रॉन्कायटिस यांसारख्या श्वसनाच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी जामुन बीज फायदेशीर आहे.  बियांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे श्वसनमार्गातील जळजळ कमी करण्यास आणि श्वासोच्छ्वास सुलभ करण्यास मदत करतात.

 दात किडण्यापासून बचाव करते:-  जामुन बीज त्याच्या दातांच्या फायद्यांसाठी देखील ओळखले जाते.  त्यात तुरट गुणधर्म असतात जे दात किडणे, हिरड्यांचे आजार आणि श्वासाची दुर्गंधी रोखण्यास मदत करतात.  जामुन चघळल्याने दात आणि हिरड्या मजबूत होण्यास मदत होते.

 त्वचेचे आरोग्य सुधारते: - जामुन बीज हे अँटिऑक्सिडंट्सचे समृद्ध स्त्रोत आहे, जे त्वचेला मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करते.  हे जळजळ कमी करण्यास आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास देखील मदत करते.  जामुन बीज पावडर गुलाबपाणी किंवा मधात मिसळून लावल्यास मुरुम, एक्जिमा आणि सोरायसिस यांसारख्या त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यास मदत होते.

 जंतुसंसर्गांवर उपचार करतात:- जामुन बीजमध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात, ज्यामुळे ते जीवाणू आणि बुरशीमुळे होणा-या संक्रमणांवर उपचार करण्यासाठी प्रभावी बनतात.  हे सामान्यतः मूत्रमार्गात संक्रमण, श्वसन संक्रमण आणि त्वचा संक्रमणांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते.

 शेवटी, जामुन बीज हे पारंपारिक औषधांमध्ये एक मौल्यवान घटक आहे, आणि त्याचे औषधी गुणधर्म हे विविध आजारांवर लोकप्रिय उपाय बनवतात.  

वरील कारले आणि जामून  यांच्या एकत्रित कॅप्सूल्स आम्ही आपल्या ऑनलाईन स्टोअरवर उपलब्ध केल्या आहेत. खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या घरपोहोच मागवू शकता.
https://anandkulkarni.in

डॉ. आनंद वामन कुलकर्णी
                        D.Y.N.D.
निसर्गोपचार, योग, आहार तज्ज्ञ
जयसिंगपूर - ४१६१०१
मोबाईल - 7744964550

शिलाजीत - औषधही ... नैसर्गिक टॉनिकही

शिलाजित, ज्याला मुमिजो किंवा मिनरल पिच असेही म्हणतात, हा हिमालय, तिबेट आणि अल्ताई पर्वताच्या उंच प्रदेशात आढळणारा एक नैसर्गिक पदार्थ आहे.  ह...